HW News Marathi
मुंबई

होळीच्या उत्सवात ‘पब्जी गेम’च्या प्रतिमेचे दहन

धनंजय दळवी | “होळी रे होळी पुरणाची पोळी,” असे म्हणत दरवर्षी होळीचा उत्सव साजरा होतो. मुंबईतील बीडीडी चाळीत जगभरात प्रसिद्ध असलेल्या पब्जी या गेमचे प्रतीकात्मक प्रतिमेचे दहन केले जाणार आहे. वाईट प्रथा, वाईट रुढी यांचे दहन करून नवीन चांगल्या वातवारणाची निर्मिती व्हावी अशी प्रार्थना होळीच्या दिवशी केली जाते. हाच उद्देश समोर ठेवून यंदा ‘आपला विघ्नहर्ता’ मंडळातर्फे ५२ फुटांची पब्जीच्या प्रतिमेचे दहन करण्यात येणार आहे.

गेल्या ८ वर्षापासून मंडळातर्फे सामाजिक विषय घेऊन होळी साजरी केली जाते. ज्या वाईट प्रथा, विचार असतील तो समाजातून नाहीसा व्हावा म्हणून मंडळ दरवर्षी प्रयत्न केले जातात. म्हणून यंदा पब्जी गेमच्या प्रतिमेचे दहन करण्यात येणार आहे. पब्जी गेममुळे सध्या अनेक तरुणांचे बळी जात आहेत. या गेमच्या तरुण मंडळी आहारी जात आहे.

तसेच पब्जी खेळण्यासाठी मोबाईल न मिळाल्याने कुर्ल्यातील तरुणांची आत्महत्या, मध्यप्रदेश मधील तरुणाने पाण्याच्या जागी ऍसिड पिल्याची घटना असेल अश्या विविध घटना होत असतांना बीडीडी चाळीतील तरुणांनी एक पाऊल पुढे टाकत. पब्जी या गेमचा निषेध करत ५२ फुटांची पब्जीच्या प्रतिमेचे दहन करणार आहेत. तसेच या मुलांनी हा गेम बंद झाला पाहिजे अशी मागणी देखील केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकल अजूनही रुळांवर येईना!

News Desk

पुढच्या १ महिन्यात मुंबईतील १५७ पुलांचे ऑडिट सादर करा, महापालिकेचा आदेश

News Desk

केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांनी घेतली ८ लाखांची लाच

News Desk