HW News Marathi
मुंबई

…अन् खेळता खेळता जीव गेला

मुंबई | विद्याविहार येथील सोमय्या महाविद्यालयात रस्सीखेच खेळ खेळताना जीबीस सनी (२२) नावच्या विद्यार्थ्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.जीबीस या विद्यार्थ्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. रस्सीखेच खेळ खेळत असताना आकस्मितपणे महाविद्यालयीन जीबीस या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. यामुळे महाविद्यालयात शोककळा पसरली आहे.

जीबीन सनी हा ठाणे येथील वागळे इस्टेट परिसरात राहणारा रहिवासी आहे. रस्सीखेच सुरू असताना जीबीस याने सर्वांच्या पुढे उभे राहत आपली ताकत लावून रस्सी खेचसाठी असलेला दोरखंड ही आपल्या खांद्यावर घेतला. परंतु, काही क्षणात खांद्यावर भार घेतल्याने जीबीन खाली कोसळला. ही बाब काॅलेजच्या सुरक्षारक्षकांच्या लक्षात येताच त्वरित जीबीनला राजावाडी रुग्णालयात आणले.

परंतु रुग्णालयात नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. विद्याविहारच्या सोमय्या महाविद्यालयाचा नर्सिंगचा हा विद्यार्थी होता. जीबीन सनीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन झाल्यावर कळेल. या घटनेबाबत टिळक नगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाईंदरमध्ये तृतीयपंथीयांना मारहाण

swarit

पोलिसांवर झालेल्या बोचरी टीकेचा पोलीस हवालदार बळी !

News Desk

‘Beach Please’ एक अनोखा उपक्रम

News Desk