HW Marathi
क्रीडा मुंबई

संजय बर्वे  मुंबई पोलीस आयुक्त तर सुबोध जयस्वाल पोलीस महासंचालक पदी नियुक्त

मुंबई | पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर आज (२८ फेब्रुवारी) सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांच्या जागी सुबोध जयस्वाल यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. तर मुंबईच्या पोलीस आयुक्‍तपदी  संजय बर्वे यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान देशात वातावरण असताना  महासंचालक व मुंबई पोलीस आयुक्त पदासारखी महत्त्वाची पदे रिक्त ठेवणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्यामुळे शुक्रवारी (१ मार्च) तात्काळ ही पदे भरण्यात येणार आहेत.

सुबोध कुमार जयस्वाल हे १९९५ बॅचचे आयपीएस अधिकारी तर संजय बर्वे हे १९८७ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. दत्‍ता पडसलगीकर यांची महासंचालकपदी नियुक्‍ती झाल्यानंतर जयस्वाल यांची मुंबईच्या पोलीस आयुक्‍तपदी नियुक्‍ती करण्यात आली होती. आता पडसलगीर हे सेवानिवृत्‍त होत असल्याने त्यांच्या जागी म्हणजेच राज्याच्या पोलीस महासंचालकपदी सुबोध जयस्वाल यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे तर रिक्‍त झालेल्या मुंबई पोलीस आयुक्‍तपदी संजय बर्वे यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

मुंबई पोलीस आयुक्‍तपदासाठी संजय बर्वे आणि अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) परमबीर सिंह यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. अखेर आज संजय बर्वे यांची मुंबई पोलीस आयुक्‍तपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे.

Related posts

 दिव्याचा दिव्य अभिनय, तीन तास जमिनीखाली

News Desk

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने तिन्ही रेल्वे मार्गावरी मेगाब्लॉक रद्द

News Desk

डोंबिवलीतलं अतिक्रमण पाडायला प्रशासनाला वेळ नाही

News Desk