Site icon HW News Marathi

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सर्व्हर डाऊन

मुंबई | मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) सर्व्हर डाऊन चेक इन करताना प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मागील 20 मिनिटांपासून विमानतळावरील सर्व्हर डाऊन झाला होता. यामुळे नियोजित फ्लाईट्स बुकिंग केले असून सुद्धा विमानतळावर चेक इनसाठी प्रवाशांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. या सर्व्हर डाऊन झाल्याने विमान उड्डाणासाठी उशीराने होत असल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे.

 

विमानतळावरील तांत्रिक अडचण सोडवण्यासाछी प्रशासन काम करत असून हे काम लवकरच सेवा पूर्वत होईल, असे विमानतळाच्या प्रशासनाने माहिती दिली आहे. अचानक विमानतळावर सर्व्हर डाऊन झाल्याने प्रवासी डेटासंबंधित असलेली सर्व कामे ठप्प झाले असल्याची माहिती माध्यमातून मिळाली. याचा परिणाम हा प्रवाशांच्या चेक इन, बोर्डिंग पास देणे, बॅगेज काऊंटर सारे काही थांबलेले आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व्हर डाऊन असल्याने दररोजपेक्षा जास्त गर्दी झाली असून या गर्दीचे व्यवस्थापन केले जात आणि मॅन्युअल पास दिले जात असल्याने गोंधळ नाही, असे  मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीआयएसएफ माहिती दिली आहे.

 

Exit mobile version