HW News Marathi
मुंबई

‘ट्री गणेशा’च्या रूपात बाप्पा राहणार आपल्यासोबत

मुंबई | यंदाचा गणेशोत्सव हा खऱ्या अर्थाने इको-फ्रेंडली साजरा होणार आहे. कारण, सरकारने प्लास्टिकसाेबत लागू केलेली थर्माकोल वापरावरील बंदी शिथिल करण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला. कारण मुंबईत थर्माकोल आणि प्लास्टिकचा सर्वात जास्त वापर केला जातो. त्यामुळे पर्यावरणाला हानी देखील पोहचते आहे. म्हणून यंदा मुंबईकरांची इको फ्रेंडली गणेशोत्सवाला अधिक पसंती मिळताना दिसत आहे. गेल्या वर्षीपासून ट्री गणेशा हा नवा पर्याय मुंबईकरांचे लक्ष वेधत आहे.

सर्वांचे लाडके आराध्य दैवत गणपती बाप्पा, आणि म्हणूनच गणेशोत्सव जवळ आला की सगळी सृष्टी चैतन्यमय वाटायला लागते. गणपतीची मूर्ती आपल्या सर्वांच्या देव्हाऱ्यात असतेच गणपतीची रोज पूजाही केली जाते पण भाद्रपदातील गणेशोत्सव जवळ आला की सगळ्यांची लगबग सुरु होते. आपल्या महाराष्ट्रात गणेशोत्सव हा महत्वाचा सण आहे, भाद्रपदातील चतुर्थीला वाजत गाजत गणरायाचे आगमन होते आणि पुढील दहा दिवस बाप्पा घरात विराजमान असतात. पूर्वी गणपतीच्या मृण्मय म्हणजे मातीच्या मूर्तीची स्थापना करायचे व प्रत्येकाच्या घरातील प्रथेप्रमाणे त्या, त्या दिवशी मूर्तीचे विसर्जन करायचे.

काय आहे ‘ट्री गणेशा’ ?

गणेशोत्सवाचे दहा दिवस सगळीकडे धामधूम असते. पण विसर्जन झाल्यानंतर काहीतरी चुकल्यासारखे वाटत रहाते. पण आपला लाडका बाप्पा विसर्जनानंतरही आपल्यासोबत राहू शकतो. हे कसे शक्य आहे? हे शक्य झाले आहे. ट्री गणेशाच्या रूपात.

‘ट्री गणेशा’चे वैशिष्ट्य म्हणजे ही गणेशमूर्ती लाल माती आणि खतापासून बनवली जाते. या मूर्ती घडवताना त्यात झाडांच्या बिया पेरल्या जातात. लाल मातीच्या या गणेशाला गेरुचा लाल रंग देऊन फिनिशिंग केले जाते. त्यानंतर ही मूर्ती कुंडीच्या आकाराच्या ‘ट्रे’ मध्ये ठेवली जाते. दीड दिवस, पाच दिवस किंवा दहा दिवस मूर्तीची पूजा केली जाते. त्यानंतर शेवटच्या दिवशी घरातल्या टपातच तुम्ही मूर्तीचे विसर्जन देखील करू शकता. लाल माती असल्याने मूर्ती लगेच पाण्यात विरघळते.

विसर्जनासाठी दुसरा पर्याय म्हणजे, बाप्पासोबत देण्यात आलेल्या ट्रेमध्येच मूर्तीला पाणी घालायचे. हा ट्रे तुमच्या गॅलरीत किंवा बागेत ठेवू शकता. आणि सहा-सात दिवस त्याला पाणी टाकले की, मूर्ती हळूहळू विरघळून बिया मातीत रुजतात. दोन आठवड्यांनंतर बियांना अंकुर फुटतो आणि त्याचे रोपटे होते. त्यामुळे विसर्जनानंतरही बाप्पा एका रोपट्याच्या माध्यमातून आपल्यासोबतच असतो. हा ट्री गणेशा साधारण ९ इंच, १२ इंच, १५ इंच व १८ इंचामध्ये उपलब्ध आहे. ज्याची किंमत साधारणपणे २२०० ते ४५०० रुपयांच्या दरम्यान आहे.

गणेशोत्सवाचे सार्वजनिक रूप –

स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप दिलं, गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाज एकत्र यावा, विचारांची देवाण घेवाण व्हावी, समाज प्रबोधन घडून यावं हा त्यामागचा मूळ उद्देश होता. इंग्रजांविरुद्ध चीड निर्माण होऊन समाज एकत्र आला की स्वातंत्र्य युद्धाला बळकटी येईल असं टिळकांना वाटायचं. त्यामुळे लोकांनी त्यांच्या हाकेला उदंड प्रतिसाद दिला. आणि लोकं घरात तसेच मंडळात दोन्ही ठिकाणी गणेशोत्सव उत्साहात साजरा करू लागले.

मंडळांची प्रसिद्धीसाठी वाढती चढाओढ –

सामाजिक बदल हा विचारांच्या बदलांनी घडून येतो, विचार बदलले उत्सव साजरे करण्याची पद्धत बदलत गेली, जसजसा काळ पुढे गेला हा उत्सव भव्य स्वरुपात साजरा कसा करावा याची चढाओढ निर्माण झाली. माझी मूर्ती जास्त भव्य, आकर्षक असावी असं प्रत्येकाला वाटू लागलं, आणि प्रत्येक मंडळांमध्ये स्पर्धा सुरू झाली. यासर्व गोष्टींना माध्यमांनी देखील तेवढाच प्रतिसाद दिला. आणि स्पर्धेसाठी हा अमुक नगरचा राजा, तो तमुक नगरचा महाराजा अशी नावे जोडून स्पर्धा निर्माण झाली. प्लॅस्टर ऑफ प्यारिसच्या मोठं मोठ्या मूर्त्यांनी ही स्पर्धा अधिक वाढली. आणि या संघर्षात माती आणि शाडूच्या मूर्त्यांची जागा केव्हा प्लास्टर ऑफ प्यारिस ने घेतली समजलंच नाही. ठिकठिकाणी आकर्षक रासायनिक रंगानी रंगवलेल्या गणेशमूर्ती तयार होऊ लागल्या, मूर्तीचा आकार भव्यता वाढत गेली. आता ह्या मुर्त्या विसर्जन कुठे करायच्या तर नदी, तलाव, समुद्र अशे मोठे मोठे जलसाठे आहेतच. पण हे नैसर्गिक जलस्त्रोत प्रदुषित होत आहेत याचे भानही आपल्याला राहिले नाही. निसर्ग मानवाला नेहमी देतो पण त्याच्या माणसाला किंमत राहिली नाही. माणूस निसर्गाचा ऱ्हास करायला निघाला, प्रमाण वाढत गेलं शेवटी त्याने रौद्र रूप धारण केलं. पर्यावरणसंबंधी समस्या वाढत जाण्याचा मार्ग प्रशस्त करण्याचं काम खरं तर माणसानीच केलं आहे.

गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी मुंबईत समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारला तर आपल्या लाडक्या गणपतीचे ते रूप पाहून जाणत्या माणसाला नक्कीच हळहळ वाटेल. गणेश मूर्ती मातीची असेल तर या जलसाठ्यात त्यांचे नीट विसर्जन झाले असते पण प्लास्टर ऑफ प्यारीस पाण्यात विरघळत नाही त्यामूळे त्याचे अवशेष जलसाठे प्रदुषित करतात शिवाय यातील रासायनिक रंग जलचर प्राण्यांसाठी घातक असतात. तलाव, नद्या हे नैसर्गिक जलस्त्रोत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभिनेता सुशांतसिंह सोबत काम केलेल्या एका अभिनेत्याने केली आत्महत्या

News Desk

गोखले पुलाचा ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

News Desk

कुत्र्यावर बलात्कार…मुंबईत सुरक्षारक्षकाला अटक

News Desk