HW News Marathi
मुंबई

बेस्टच्या संपावर आजही तोडगा नाहीच, उद्या सकाळी होणार पुन्हा सुनावणी

मुंबई | बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज (१५ जानेवारी) आठवा दिवस आहे. दरम्यान, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर आज तरी तोडगा निघणार का ? याप्रकरणी न्यायालयात दुपारी ३ वाजता सुनावणी सुरु झाली असून मुंबई उच्च न्यायालय नेमका काय निर्णय सुनावणार याच्याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. बेस्ट कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाने संप मागे घेण्याचे निर्देश दिले असून आजही या संपावर कोणताही तोडगा निघालेला नाही. उद्या सकाळी ११ वाजता पुन्हा या प्रकरणी उच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.

बेस्ट प्रशासनाकडून आज उच्चस्तरीय समितीला अहवाल सादर करण्यात आला होता. या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे एका मराठी वृत्तवाहिनीच्या वृत्तातून समोर आले आहेत.

  • बेस्ट प्रशासनाच्या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे
  • बेस्ट प्रशासनाला वर्षभरात ९०० कोटींचा तोटा
  • बेस्टवर २.५ हजार कोटींचे कर्ज
  • बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करणे अशक्य, कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या तर

    ५५० कोटींचा भार पडणार

  • बेस्टचे दिवसाचे उत्पन्न ३ कोटी तर खर्च ६ कोटी
  • कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी बेस्टला कर्ज घ्यावे लागते
  • कंत्राटी कर्मचारी घेण्याचा बेस्टचा विचार
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी आदित्य नारायण अटक, रिक्षा चालक आणि महिला गंभीर जखमी

News Desk

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेननप्रमाणे भिडे, एकबोटेवर कारवाई कराः प्रकाश आंबेडकर

News Desk

डान्स बारचा धंदा सर्वत्र तेजीत

News Desk