HW News Marathi
मुंबई

यंदा लहान गणेशमूर्त्यांना फायबरची प्रभावळ 

मुंबई | मुंबईमध्ये गणेशोत्सव धूम धडाक्यात साजरी होतो. मोठं मोठ्या मंगलमूर्तीचे आगमनाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत फक्त सार्वजनिक गणेश मुर्त्यांनाच फायबरची प्रभावळ लावण्यात येत होती. सार्वजनिक गणेश मुर्त्यांचं वजन जास्त असल्यामुळं त्या उचलणं गणेश मंडळांना जड पडत होतं. त्यामुळं या मुर्त्यांचं वजन कमी करण्यासाठी त्यांना फायबर प्रभावळ लावली जाते. पण आता घरगुती गणपतींनादेखील फायबरची प्रभावळ लावली जात आहे. त्यामुळं घरगुती मुर्त्या उचलणं अधिकच सोपं होणार आहे.
कुठे आहेत ह्या गणेश मुर्त्या
परळ येथील सेंट्रल रेल्वे वर्क शॉप येथील ‘कलासागर आर्ट’ या घरगुती गणेश मुर्तींच्या कार्यशाळेत मुर्त्यांना फायबरची प्रभावळ लावली जात आहे. तसंच ही प्रभावळ सहज काढताही येते. त्यामुळं पुढच्या वर्षी सुद्धा या प्रभावळीचा उपयोग होऊ शकतो. त्याचप्रमाणं पीओपीपेक्षा फायबरच्या प्रभावळीवर कोरीव काम करणं अधिक सोपं जातं. या कार्यशाळेतील २ ते ३ फुटांच्या गणेश मुर्तींची किंमत ६ हजार पासून १५ ते १८ हजार रुपयांपर्यंत आहे.
पीओपी वर फायबरचा पर्याय
साधारणत: पीओपी आणि शाडू मातीचे प्रभावळ जड असल्यामुळे यंदा मात्र, या मुर्त्यांच्या प्रभावळीचं वजन कमी करण्याचा उपाय वैभव माने यांनी शोधून काढला आहे. वजन जास्त असल्यामुळं मुर्ती घरी आणतांना आणि विसर्जनावेळी उचलणं खूपचं जड जायचं त्याचप्रमाणं एखादी मूर्ती २ ते ३ फुटांची असेल तर ती मूर्ती उचलण्यासाठी २ माणसांची गरज भासते. त्यामुळे गणपतीच्या मुर्तीचं वजन अधिक जास्त होतं. हे वजन कमी करण्यासाठी आम्ही घरगुती गणेश मुर्त्यांना फायबरची प्रभावळ लावत आहोत. फायबरच्या प्रभावळीचं वजन अगदी कमी असतं. असे मूर्तिकार वैभव माने, यांनी ‘एच डब्लूला’ सांगितले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वरळीत गल्लीगल्लीत फिरायला लावणार, पण विजय माझाच होणार! – आदित्य ठाकरे 

Aprna

लालबागमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट २० जण जखमी

News Desk

डबेवाल्यांच्या माध्यमातून प्रदुषण मुक्तीचा संदेश

swarit