HW News Marathi
मुंबई

गिरगावच्या कोठारी हाऊस इमारतीला आग

मुंबई | मुंबईतील गिरगाव येथील गोरेगावकर लेन परिसरात भीषण आग लागली आहे. काही जण इमारतीच्या गच्चीवर अडकले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सेंट्रल प्लाझाजवळील कोठारी हाऊस या चार मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. इमरतीच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर ही आग लागली आहे.

अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून अग्निशमनदलाकडून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याच इमारतीमध्ये बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याचे हॉटेल ब्रॉडवे रेस्टॉरंट आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाग्रस्तांच्या संख्येनुसार आरोग्य विभागाकडे पुरेशी संसाधने उपलब्ध

News Desk

पहिल्याच पावसात रेल्वेचा बोजवारा

News Desk

1300 मराठी शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा निषेध- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

swarit