HW News Marathi
मुंबई

ताडदेव आरटीओ कँटीनमध्ये आग 

मुंबई | ताडदेव आरटीओला या पुर्वी तीन वेळा आगी लागल्याची घटना घडली होती. २०१५ मध्ये दोन वेळेस तर गेल्या रविवारी मोठी आग लागली होती. आरटीओ कँटीन मधील शेगडीचा भडका उडाल्याने आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली.
आरटीओ अधिकारी आणि कँटीन मधील कर्मचारी कार्यालयात बसविलेल्या अग्निशमन यंत्राने आग विझविण्यात यश आले. कँटीन सुरू असताना एका शेगडीचा भडका उडाल्यामुळे कँटीनमधील वस्तुंनी पेट घेतला. १२ अग्निशमन यंत्रांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न सुरू असून सद्यस्थितीत कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती समोर येत आहे. गॅस लिकेजमुळे आग लागली असल्याचे कँटीनमधील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रुग्णालय बंद असल्याने रुग्णांचे हाल, प्रशासन मात्र झोपे; राजेश शर्मा यांचे गंभीर आरोप

Chetan Kirdat

मालवानीत इमारतीचे छत कोसळले, दोन जण जखमी

News Desk

एलफिस्टन आणि करी रोड पुल फेब्रुवारी महिन्यात खुला

swarit