Site icon HW News Marathi

ठाकरे कुटुंबियांच्या बेहिशेबी संपत्तीची केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करा; याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बेहिशेबी संपत्ती जमा केल्याचा आरोप करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज (19 ऑक्टोबर) न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही  गौरी भिडे या दादर येथील रहिवासी आहेत. गौरी भिडे यांनी उद्धव ठाकरेंनी बेहिशेबी संपत्ती जमा केल्या आरोप करत न्यायालयात जनहित दाखल केली आहे. उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची चौकशी केंद्रीयनेच्या माध्यमातून व्हावी, अशी मागणी करणारी ही याचिका आहे.  यासंदर्भात काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांचेही नाव या याचिकेत आहे. देशातील केंद्र सरकार, राज्य सरकार, सीबीआय आणि ईडी या तपास यंत्रणेंनी तपास करावा,असे याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयातील  जय गंगापुरवाला आणि आर एम लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

गौरी भिडे यांनी 11 जुलै 2022 रोजी मुंबई पोलीस आयुक्तांकडे पत्र लिहून तक्रार दाखल केली होती. गौरी भिडेंनी पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीवर उद्धव ठाकरेंवर काहीच कारवाई झालेली नाही. गेल्या 7-8 वर्षापासून ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ या संकल्पेनी प्रेति झाले असून या देशाची एक प्रामाणिक आणि जागरुक नागरिक म्हणून केंद्र सरकारला मदत करण्यासाठी मी उद्धव ठाकरेंची बेहिशेबी संपत्ती बाहेर काढण्यासाठी याचिका दाखल केल्यांचे त्यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे.

तसेच उद्धव ठाकरे हे राज्याचे माजी मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे हे माजी कॅबिनेट आणि पर्यावर मंत्री राहिले होते. या लोकप्रतिनिधी म्हणून यांनी आयपीसीचे कलम 21 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधनक कायदा लागू होते. या कायद्यानुसार रश्मी ठाकरे आण तेजस ठाकरे यांची देखील चौकशई व्हावी, असेही गौरी भिंडेंनी याचिकेत म्हटले आहे.

 

 

Exit mobile version