HW News Marathi
मुंबई

महिंद्रा अँड महिंद्राच्या कामगारांना अच्छे दिन

मुंबई | कामगार नेते आणि माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी उद्योग धंद्यात अग्रेसर असलेल्या कांदिवली येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील सुमारे 2200 कामगारांना महिना 10600 ते 16500 रुपयांची भरघोस पगारवाढ देऊन अच्छे दिन दाखवले आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा महिंद्रा कंपनीतील कामगारांना पगार वाढ व अन्य सुविधा यासोबत माहिती देण्यासाठी बैठक कांदिवली येथील कंपनीच्याच सभागृहात पार पडली.

यावेळी सरचिटणीस माजी राज्यमंत्री सचिन अहिर,महिंद्रा वर्कर्स युनियनचे अध्यक्ष राजू सहानी,व्यवस्थापन विभागाचे विजय कालरा,व्हा. प्रे.(आँपरेशन),विजय नायर,व्हा.प्रे. एच. आर. सुनिल कलकर्णी, आँपरेशन हेड,त्यासोबत कांदिवली कंपनीतील कामगार प्रतिनिधी उपस्थित होते. यांच्या मध्यस्थीने पगार वाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. ग्राहकांना चांगल्या प्रतीच्या वस्तू व त्यांच्या मनात विश्‍वासार्हता निर्माण केल्यास ग्राहक संख्या वाढते.

मुंबईसारख्या शहरात कंपन्या बंद होत असताना महिंद्रा अँड महिंद्रा मध्ये चौदाशे कामगारांना कायमस्वरूपी करण्याचे काम महिंद्रा वर्कर्स युनियनच्या प्रयत्नांमुळे शक्य झाल्याचे सचिन अहिर यांनी सांगितले. डॉक्युमेंट्री बनवून तरुणांमध्ये संघटनेबद्दल जनजागृती करून त्यांच्यातील आस्था वाढवण्याचे काम करायला हवे, संघटनेचे सभासद वाढवायला हवेत, तरुणांसाठी स्वत घरे उपलब्ध करून देण्याची समितीसोबत चर्चा चालू असल्याचे अहिर यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निधी नको, सुरक्षित ठिकाणी घर द्या, माहुल प्रकल्पग्रस्तांची मागणी

News Desk

प्रत्यारोपणासाठी ‘यकृताचा’ ठाणे ते दादर लोकलप्रवास

News Desk

राज्य आणि जिल्हा सहकारी बँकेत नोटबंदी दरम्यान अनियमितता,गोंधळ आणि भ्रष्टाचाराची माहिती नाही- आरबीआय

News Desk