Site icon HW News Marathi

भगत सिंह कोश्यारींनी राज्यपाल पद सोडण्याची पंतप्रधान मोदींकडे केली इच्छा व्यक्त

मुंबई |  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी राज्यपाल पदवरून पायउतार होण्याची पत्र लिहून इच्छा व्यक्त  केली आहे. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून राजीनामा देण्याची इच्छा पत्रात व्यक्त केल्याची माहिती ‘एबीपी माझा’ने दिली आहे.  आहे. भगतसिंग कोश्यारी हे राज्यपाल पदावर विराजमान झाल्यापासून ते नेहमी वादाच्या भोवऱ्यात राहिलेले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले होते.

 

विरोधकांनी महापुरुषांच्या अपमानाविरोधात राज्यपालांनी राजीनामा द्यावा म्हणून राज्यभरात आंदोलन केली होती. भगतसिंग कोश्यारींना राजकीय जबाबदारीतून मुक्त होणार असून उर्वरित काळ हा अध्ययन, मनन आणि चिंतना व्यतीत करण्याची इच्छितो, अशी इच्छा त्यांनी पंतप्रधानांकडे व्यक्त केल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.

 

राज्यपालांनी प्रसिद्ध पत्रात नेमके काय म्हणाले

गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ राज्यातील सर्व सामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी मी कधीही विसरणार नाही. नुकत्याच माननीय पंतप्रधानांच्या मुंबई दौरा झाला. या दौऱ्यादरम्यान राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

 

Exit mobile version