Site icon HW News Marathi

“…ते वाघ आहे की नाही हे मला माहित नाही”; राऊतांच्या सुटकेवर सत्तारांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | “राऊत यांना माझ्या शुभेच्छा, पण ते वाघ आहे की नाही हे मला माहित नाही, न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करायला हवा”,अशी सावध प्रतिक्रिया राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांच्या सुटकेवर दिली आहे. सत्तार हे आज (10 नोव्हेंबर) संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात मराठ्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भात घेतलेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले.

काही दिवसांपूर्वी सत्तारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर ते चांगलेच अडचणीत सापडले होते. त्यानंतर सत्तारांनी आपण केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगीरी सुद्धा व्यक्त केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तारांना समज दिल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे. यानंतर आता सत्तार हे चांगलेच अलर्ट झाले असून त्यांनी आता अधिकचे राजकीय विषयांवर भाष्य करण्यास नकार दिला आहे. आज संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात सत्तार यांनी मराठवाड्यातील शेतीच्या नुकसानी संदर्भात बैठक घेतली. या बैठकीनंतर सत्तारांना पत्रकारांनी राजकीय प्रश्न विचारला. यावर सत्तार म्हणाले, “पत्रकारांनी अधिकच हट्ट धरल्यानेंनी राऊत यांच्या जामीनाबाबत मात्र भाष्य केले. राऊतांना माझ्या शुभेच्छा, पण ते वाघ आहे की नाही हे मला माहित नाही, न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करायला हवा असे सांगत. मी अधिकच बोललो तर तुम्ही मला अडकवाल अशी आठवण देखील त्यांनी पत्रकारांना करून दिली.”

मुंबईच्या गोरेगावमधील कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी अखेर संजय राऊत यांना जामीन मिळाला. १०० पेक्षा अधिक दिवस तुरुंगात असलेला संजय राऊत यांची आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली असून राऊतांनी मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख यांची भेट घेतली त्यावेळी युवा नेते आदित्य ठाकरे देखील उपस्तित होते. त्यांनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीचे प्रमुख शरद पवार यांची त्यांच्या सिल्वर ओक्स या निवासस्थानी जाऊन भेट घेतली त्यानंतर ते सामना प्रेस मध्ये दाखल झाले असून पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. तर पुन्हा आता संजय राऊत आपल्या हटके अंदाजात विरोधकांवर निशाणा साधणार का? या कडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागला आहे.

Exit mobile version