HW News Marathi
मुंबई

नायर रुग्णालयातून चोरीला गेलेले बाळ सापडले

मुंबई | नायर रुग्णालयात गुरुवारी (१३ जून) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास नवजात बाळ चोरीला जाण्याची घटना घडली आहे. ज्या महिलेचे बाळ चोरीला गेले तिचे नाव शीतल साळवी असून त्या दहिसरमध्ये राहतात. शीतल यांची पाच विसांपूर्वी नायर रुग्णालयात प्रसूती झाली. असून काल त्या सायंकाळी झोपलेल्या असताना एक अनोळखी बाई वॉर्डमध्ये आली वॉर्डमध्ये आली आणि बाळाला चोरून घेऊन गेली. रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक ७ मधून हे नवजात बाळ चोरीला गेले आहे.

बाळ चोरीची घटना आग्रीपाडा पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्यानंतर पोलिसांनी भा.द.वी. कलम ३६३ (अपहरण)चा गुन्हा दाखल करून बाळाचा शोध सुरू केला. सर्वप्रथम पोलिसांनी रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा त्यांना बाळ चोरुन नेणारी महिला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसली. रुग्णालयातील एका सीसीटीव्हीमध्ये एक महिला धावत रुग्णालयाबाहेर जात असल्याचेही दिसत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र त्या महिले सारखी दिसणारी महिला व्ही. एन. देसाई रुग्णालयात आली आहे.

काही पुरावे हाती लागताच पोलिसांनी अवघ्या काही तासात बाळाला शोधून काढले आहे. बाळ सांताक्रूझमधील एका रुग्णालयात सापडले. त्यानंतर पोलिसांनी बाळाच्या वडिलांना बोलावून बाळाची ओळख करून घेतली. दरम्यान पोलिसांनी बाळ चोरुन नेणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीएसएमटी रेल्वे स्थानकावर लोकल बफरला धडकून अपघात

News Desk

रविवारी हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही, प्रवाशांमध्ये उत्साह

swarit

कृषीमंत्र्यांना भेटू द्या, अन्यथा सातव्या मजल्यावरून उडी मारेन video

News Desk