HW News Marathi
मुंबई

पोलिसांवर झालेल्या बोचरी टीकेचा पोलीस हवालदार बळी !

 

उल्हासनगर | टोइंग गाडीने ऍक्टिवा दुचाकी उचलल्यावर वयोवृद्ध व्यापाऱ्याने वाहन सोडण्यावरून हवालदाराबरोबर शाब्दिक वाद घालत हवालदाराच्या गुप्तांगावर लाथ मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या हवालदार आणि व्यापारी यांच्यात मारामारी झाल्याची घटना सोशल मीडियाने रंगवून दाखवत वाहतूक हवालदारावर कारवाई करण्याची मागणी सिंधी समाजाने करीत पोलिस प्रशासनावर बोचरी टीका केली.

या दबावाला पोलीस प्रशासन बळी पडत हवालदाराला निलंबित करण्याचे आदेश दिल्याचे समजते. उल्हासनगर कॅम्प 3 येथील 17 सेक्शन परिसरात व्यापारी जवाहर लुल्ला यांनी त्यांची ऍक्टिवा ही दुचाकी रोडवर डबल पार्किंग मध्ये उभी केली होती. ही गाडी वाहतूक पोलिसांच्या क्रेनने टोइंग केली. गाडी टोइंग झाल्यानंतर लुल्ला यांनी दुचाकी गाडीतून खेचण्याचा प्रयत्न केला. पण टोइंग कर्मचाऱ्याने दुचाकी घट्ट पकडून ठेवल्याने व्यापाऱ्याला ती खेचता आली नाही. त्यांनी गाडीत बसलेले हवालदार बळीराम पाटील यांच्याकडे गाडी सोडण्याचा तगादा लावला. त्यानंतर संघर्ष होऊन त्याचे रुपांतर हाणामारीत झाले.

याबाबत हवालदार बाळाराम पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की मोबाईल बाजार हा अरुंद रस्ता आहे. या रस्त्यावर पार्किंग केलेल्या वाहनांची एक रांग असेल तर आम्ही कारवाई करीत नाही. मात्र जवाहर लुल्ला यांची ऍक्टिवा डबल पार्किंग मध्ये रस्त्यावर असल्याने वाहतुकीला अडथळा होत असल्याने गाडी टोइंग केली. लुल्ला हे दुचाकी टोइंग झाल्यानंतर धावत आले आणि गाडी उतरविण्याचा हेका लावला. सदरचा रस्ता अरुंद असल्याने टोइंग गाडीच्या मागे वाहतूक कोंडी झाली होती.

यामुळे लुल्ला याना पुढच्या चौकात येण्यास सांगितले. मात्र त्यांनी शिव्या देण्यास सुरुवात केली आणि मी गाडीत बसल्यावर माझी कॉलर पकडली. गाडी पुढे जाऊ नये म्हणून अडचण करू लागले. मी खाली उतरल्यावर लुल्लानी पायाचा गुडघा माझ्या गुप्तांगावर मारण्याचा प्रयत्न केला. तो त्यांचा मारा उडी मारून वाचवला. मात्र यामुळे माझा राग अनावर होऊन मारामारी झाली. मी लुल्ला यांची गाडी वाहतूक शाखेत जमा करून मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठले. सदरच्या प्रकरणात सिंधी समाजाच्या नागरिकांनी वाहतूक शाखा गाठत वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप गोसावी याना एकतर्फी कहाणी सांगितली.

त्यात माध्यमांनी ही तेल ओतून पोलीस प्रशासन नालायक असल्याचा धिंगोरा पिटत कारवाईची मागणी केली. याबाबत कायद्याने वागा संघटनेचे पदाधिकारी स्वप्निल पाटील यांनी सांगितले की प्रशासनाने दोन्ही बाजु जाणणे गरजेचे आहे. एखाद्या पोलिसाच्या गुप्तांगावर लाथ मारण्याचा प्रयत्न झाल्यानंतर कायदा सुव्यस्था किती लयाला गेली आहे, याचे हे उदाहरण आहे. उलट पोलिसांवर दबाव आणून व्यापारी लुल्ला हे वयोवृध्द असल्याचे समर्थन केले जात आहे. जर असेच होत राहिले तर उल्हासनगर शहरात कोणीही पोलीस हवालदार टोइंगवर काम करण्यास तयार होणार नाही, परिणामी शहरात वाहतुकीचा बोजवारा उडेल. याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले की या प्रकरणात गाडी जागीच उतरविणे गरजेचे होते, ते झालेले दिसून येत नाही. वरिष्ठांच्या आदेशाने चौकशी सुरू केली आहे, सदरची कारवाई प्राथमिक अहवालावर आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भरधाव दुचाकी टेम्पोला धडकून तीन तरुण ठार

News Desk

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो ३ प्रकल्पाचे खोदकाम पूर्ण

News Desk

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

News Desk