HW News Marathi
मुंबई

कासकरच्या हस्तकांनी खंडणीतील सोने उधळले बारबालांवर

ठाणे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरसह चौघांना पोलिसांनी अटक केल्यानंतर कासकरच्या हस्तकांनी धक्कादायक खुलासे करत आहेत. कासकरच्या हस्तकांनी ठाण्यातील एका सराफा व्यावसायिकाकडून खंडणीपोटी उकळलेल्या ४० तोळे सोन्यापैकी जवळपास निम्मे सोने बारबालांवर उडवल्याची कबुली दिली आहे. इक्कबाल कासकर आण त्याच्या हस्ताकावर जागेच्या वादातून खंडणी उकळल्याचे तीन गुन्हे त्यांच्यावर आहेत.

ठाण्यातील एका सराफा व्यावसायिकाकडून या आरोपींनी ४० तोळे सोन्याची खंडणी उकळली होती. त्यापैकी काही सोने आरोपींनी मालाड येथील एका सराफा व्यावसायिकास विकल्याची माहिती पोलिसांना चौकशीदरम्यान मिळाली. त्यानुसार, या व्यावसायिकाकडून २० तोळे सोने पोलिसांनी हस्तगत केले. आरोपींनी काही सोने बारबालांना भेट म्हणून दिल्याची माहितीही पोलिसांना मिळाली आहे. या बारबालांचा शोध घेणे आणि त्यांच्याकडून सोने हस्तगत करणे पोलिसांसाठी कठीण झाले आहे.

खंडणीप्रकरणी अटकेत असलेला छोटा शकीलचा फायनान्सर पंकज गंगर याची सोमवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. गंगरला न्यायालयाने यापूर्वी दोन वेळा पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी पोलिसांनी पुन्हा गंगरच्या पोलीस कोठडीची मागणी केली. १२ दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण झाल्याचे सांगून आरोपीच्या वकिलांनी विरोध दर्शवला. त्यानुसार, न्यायालयाने गंगरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधि व न्याय विभाग उच्च न्यायालयात माहिती तंत्रज्ञानासंबंधी दोन पदांच्या निर्मितीस मान्यता

News Desk

भुलाबाई देसाई रोडवरील गाळ्यांना भीषण आग

News Desk

अन्नदात्याच्या मदतीला अन्नदुत धावला

News Desk