Site icon HW News Marathi

नेहरूनगर येथील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करावी! – मंगलप्रभात लोढा

मुंबई | नेहरूनगर रोड येथे अनधिकृत फेरीवाल्यांवर प्रशासनाने कारवाई करून या परिसराचे सुशोभिकरण करण्याच्या सूचना मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी दिल्या. एल वॉर्ड, कुर्ला (पश्च‍िम) येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, सर्व विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

नेहरूनगर रोड येथील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई व्हावी, अशी तक्रार प्राप्त झाली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात यावी, या परिसरात कचरा टाकणाऱ्यांची चौकशी करून प्रशासनाने कारवाई करावी. संघर्ष नगर येथील दत्तक वस्ती योजनेतील गैरप्रकाराची चौकशी करून याबाबत संबधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश मंत्री लोढा यांनी दिले.

 

मिठी नदी एलबीएस मार्ग परिसरातील मिठी नदीचा गाळ काढणे तसेच स्वच्छता करणे अत्यंत आवश्यक आहे, पंपिंग स्टेशन तयार करणे, पाणी वेळेत न येणे, नादुरूस्त स्ट्रीट लाईट दुरूस्त करून मिळाव्यात यासह १०५ विविध विषयांवर नागरिकांनी आपले तक्रार अर्ज दिले. तर ७० अर्जदारांनी पालकमंत्री यांच्या समोर समस्या मांडल्या. उपस्थित अधिकाऱ्यांना यावर तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री लोढा यांनी यावेळी दिल्या. ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ हा उपक्रम उद्या टी वॉर्ड- मुलुंड येथे होणार  असून. नियोजित रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल.

Exit mobile version