HW News Marathi
मुंबई

स्वातंत्र्य दिनानिमित्त बाजारपेठा तिरंग्यात रंगल्या

मुंबई | ७१ व्या स्वातंत्र्य दिना निम्मित मुंबईतील अनेक बाजारपेठा तिरंग्यात रंगल्या आहेत. यंदा भारताचा ७१ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्तान मुंबईत नायलॉनच्या पेपरचे छोटे तिरंगी झेंडे, बिल्ले, स्टीकर्स, स्टँड फ्लॅग, कॅप, बँड, तोरण, बलून, तिरंगी दुपट्टे, तिरंगी रंगाचे टि-शर्ट यांसारख्या विविध वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. या दिनानिमित्त लागणाऱ्या विविध वस्तू बाजारात विक्रीला आल्या असून त्यांची किंमत १० रुपयापासून अगदी १०० रूपयापर्यंत आहेत.

भारताच्या स्वांतत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यासाठी महाराष्ट्रासह अवघा देश सज्ज झाला आहे. विविध शासकीय कार्यालय, खाजगी कार्यालय, शैक्षणिक संस्था व आजूबाजूच्या इतर परिसरात स्वातंत्र्य दिनाच्या जय्यत तयारीला सुरूवात झाली आहे. मध्यम आणि लहान आकाराचे नायलॉनचे झेंडे, गाडीत ठेवण्यासाठी किंवा दुचाकीला लावण्यासाठी स्टँड असलेला तिरंगी झेंडा, शर्टाला लावण्यासाठी तिरंगी बिल्ले, तिरंगी फुगे, हातात घालण्यासाठी बँड, त्याशिवाय तिरंगी रंगाचे टि-शर्ट, या वस्तूंनी मुंबईतील बाजार फुलला आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्य दिनाला दोन दिवस बाकी असूनही अगदी लहानांपासून ज्येष्ठ मंडळीही ही वस्तू मोठ्या हौसेने विकत घेताना दिसत आहेत.

प्लास्टिक बंदीचा परिणाम –

दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त कागदी आणि प्लास्टिकचे छोटे झेंडे यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. परंतु यंदा सरकारनं प्लास्टिक बंदी लागू केल्यानं प्लास्टिकचे झेंडे बाजारात पाहायला मिळत नसून कागदाचे झेंडेही बाजारात दिसेनासे झाले आहे. त्याऐवजी पर्याय म्हणून नायलॉनच्या कपड्यानं बनवलेले राष्ट्रध्वज बाजारात दिसत आहेत. दरम्यानं या सर्व वस्तूंमुळे बाजारात तिरंगी वातावरण पसरलं असून या प्रत्येक गोष्टीतून देशप्रेम व्यक्त होताना दिसत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरे कारशेड प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी , झाडे तोडणे सुरूच असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप

News Desk

कासकरच्या हस्तकांनी खंडणीतील सोने उधळले बारबालांवर

News Desk

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घोषणांनी अंधेरी स्थानक दणाणले

News Desk