HW News Marathi
मुंबई

मनसेच्या ६ नगरसेवकांची घरवापसी, शिवसेनेनं मनसेला पाडलं खिंडार

मुंबई – शिवसेनेनं दिवाळी पूर्वीच दिवाळी साजरी करत एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. एकीकडे महापौरपदाचे स्वप्न पहाणाऱ्या भाजपला जमिनीवर आणलं आहे तर मनसेला धक्का देत त्यांच्या सह नगरसेवकांना शिवसेनेत खेचण्यात यश मिळवलं आहे. या सहा नगरसेवकांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित जाहीर प्रवेश केला.

मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत येण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांना सर्व कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करून प्रवेश देण्यात आल्याचे उद्धव यांनी स्पष्ट केले. या प्रवेशामुळे शिवसेना आणखीन मजबूत झाली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मनसेचे जेष्ठ नगरसेवक दिलीप लांडे, अर्चना भालेराव, अश्विनी माटेकर, हर्षला मोरे, दत्तात्रय नरवणकर, आणि परमेश्वर कदम या सहा जणांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे सध्या ८४ नगरसेवक आहेत. त्यांना ४ अपक्षांचा पाठींबा आहे. त्यात आता मनसेतून ६ नगरसेवकांनी शिवसेनेतून प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ९४ वर गेले आहे. शिवसेनेच्या या खेळीने भाजपला चेकमेट मिळाला आहे तर मनसेचे पाय आणखीन खोलात गेले आहेत. मनसेकडे आता केवळ १ नगर सेवक शिल्लक राहीला आहे. शिवसेनेच्या या खेळीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठी महापौर हटवण्याची भाषा भाजपकडून केली जात होती. ही बाब आपल्या पचनी पडली नाही त्यामुळेच मनसेच्या ६ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे मनसेचे बंडखोर नगरसेवर दिलीप लांडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बेस्टच्या संपावर उच्च न्यायालयात नेमके काय घडले ? वाचा सविस्तर संभाषण

News Desk

बीएमसी आयुक्तांना मुख्यमंत्री वाचवतायत – संजय निरूपम

News Desk

‘देशमुखांच्या अडचणीत आणखीनच वाढ,’ काटोल आणि वडविहिरातील निवासस्थानी ईडीचा छापा!

News Desk