HW News Marathi
मुंबई

मुंबईतील कोस्टल रोडच्या खोदलेल्या खड्यात पडून मुलाचा मृत्यू

मुंबई | कोस्टल रोडसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू घडल्याची घटना मुंबईत घडली आहे. हा मुलगा वरळी सी लिंकजवळ कोस्ट रोडच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडाला होता. रोडच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर खड्डे खोदण्यात आले असून, वरळी सी लिंकजवळ खोदलेल्या अशाच एका खड्ड्यात आज (१३ जुलै) हा मुलगा पडला. पावसामुळे या खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने या खड्ड्यात हा मुलगा बुडाला. दरम्यान, त्याला खड्ड्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

गोरेगाव येथील पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असलेल्या विटभट्टी या झोपडपट्टीतील उघड्या गटारीमध्ये पडलेला दिड वर्षीय दिव्यांश सिंह नावाचा बालक तीन दिवसांच्या शोध कार्यानंतरही सापडत नसल्याने, त्याविरोधात संतप्त नागरिकांनी आज पालिका पी.दक्षिण कार्यालयावर आक्रोश मार्चा काढून आपला संताप व्यक्त केला. दिव्यांशला शोधण्यासाठी अग्निशमन, पालिका कर्मचारी आणि एनडीआरएफ टीम शोध कार्य करत होती. परंतु त्याचा मृतदेह शोधण्यास या तिन्ही यंत्रणाना अपयश आल्याने अखेर हा मोर्चा काढावा लागल्याची माहिती संतप्त नागरिकांनी यावेळी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईसह उपनगरात महिला गोविंदा दहीहंडीसाठी सज्ज

News Desk

मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी

News Desk

Raj Thackeray ED : मरिन ड्राईव्ह, दादर, आझाद मैदानासह ईडी कार्यालयाबाहेर जमाव बंदी

News Desk