HW News Marathi
मुंबई

आर्यन खानला पुन्हा धक्का! ड्रग्ज प्रकरणात जामीन अर्ज फेटाळला

मुंबई | बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान मुंबईतील क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अधिकाधिक अडचणीत सापडत असल्याचं चित्र आहे. तीन ऑक्टोबरपासून एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आर्यनला या प्रकरणात कोणताही दिलासा न मिळता उलट त्याच्या अडचणीत जास्तीच वाढ होत आहे. आज (२० ऑक्टोबर) पुन्हा एकदा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे, आर्यनला आणखी काही दिवस तुरुंगातच काढावे लागणार आहेत. एनडीपीएसच्या विशेष न्यायालयात आज या प्रकरणी सुनावणी झाली.

एनसीबीकडून या प्रकरणी आर्यनची अधिक चौकशी करण्यासाठी कोठडी वाढवून मागण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईच्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनुमन धामेचा यांचाही जमीन अर्ज फेटाळून लावल्याने हे प्रकरण आणखी गंभीर वळण घेत असल्याचं स्पष्ट होत आहे. आर्यनच्या जामिनावर सुनावणी करणाऱ्या विशेष एनडीपीएस न्यायालयाने गेल्या सुनावणीत जामिनावरील निर्णय राखून ठेवला होता. एनसीबीने १४ ऑक्टोबर रोजी आर्यन खानच्या जामीन अर्जाला विशेष एनडीपीए न्यायालयात विरोध केला आणि दावा केला की तो ड्रग्सचा नियमित ग्राहक आहे. १३ दिवसानंतरही आर्यन खानला जामीन मिळालेला नाही.

ड्रग्ज प्रकरणात आर्यनला अटक केल्यानंतर एनसीबीने त्याचा मोबाईल ताब्यात घेतला. यावेळी त्याच्या व्हॉट्सअॅप चॅटचा तपास करण्यात आला असता त्यात ड्रग्ज रॅकेटशी संबंधित अनेक बाबी एनसीबीला आढळून आल्याचं सूत्रांनी सांगितलं. एका नवोदित अभिनेत्रीसोबतचे आर्यनचे चॅटही एनसीबीच्या हाती लागले आहेत. त्यातही ड्रग्जवर तो चर्चा करत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळेही त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान तसेच इतर सात आरोपींना अटक करण्यात आले. यामध्ये आर्यनचा मित्र अरबाज मर्चंट तसेच मॉडेल मूनमून धमेचा यांचा समावेश होता.

नेमकं काय झालं होतं?

आर्यन खान आणि अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या तिघांना नारकोटिक ड्रग्स आणि सायकोट्रॉपिक सब्स्टन्स अॅक्ट (एनडीपीएस) प्रकरणांसाठी विशेष न्यायाधीश व्ही व्ही पाटील यांच्या न्यायालयात जामीन अर्ज केला आहे. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) अनिल सिंग यांनी एनसीबीचे म्हणणे मांडले. आर्यन खान गेल्या काही वर्षांपासून मादक पदार्थांचा नियमित ग्राहक होता हे दाखवणारे पुरावे आहेत, असे अनिल सिंह यांनी म्हटले होत. यासह, त्यांनी आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटचा हवाला देऊन षड्यंत्रात सहभागी असल्याचा आरोप पुन्हा केला.एनसीबीने तीन ऑक्टोबरला आर्यन खानला अटक केली होती. जामीन न मिळाल्याने आर्यन खानला आर्थर रोड जेलमध्ये हलवण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘दमण’च्या नागरिकाने रेल्वे मंत्र्यांना केले होते सावध

News Desk

शिर्केने उभारली अनधिकृत इमारत म्हाडाने अदा केले 19 कोटी

News Desk

देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसंदर्भात उद्धव ठाकरे म्हणाले…

Aprna