Site icon HW News Marathi

शरद पवार यांना मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. शरद पवार यांची तब्येत ठीक नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले होते. यानंतर शरद पवार यांना आज (7 नोव्हेंबर) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार हे सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी जणार आहे.

दरम्यान, शरद पवार यांना 31 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसने ट्वटी करत दिले होती. शरद पवारांना तीन दिवस उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात येणार होते. परंतु, शरद पवारांची प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रहावे लागले. यानंतर तब्बल आठ दिवसांपासून शरद पवार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

शरद पवारांनी रुग्णालयात उपचार घेत असताना सुद्धा शिर्डीतील पक्षाच्या शिबिरात हजेरील लागवली होती. यासाठी शरद पवार हे शनिवारी (5 नोव्हेंबर) दुपारी डॉक्टरांच्या पथकासह विशेष हेलिकॉप्टरने शिर्डीच्या शिबिरासाठी दाखल झाले. यावेळी शरद पवारांनी शिबिरात सहभागी झाल्याने पक्षाच्या कार्यकर्ते उत्साही झाले होते.

संबंधित बातम्या

शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; पुढील तीन दिवस उपचार घेणार

Exit mobile version