HW Marathi
मुंबई

महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून ३०० प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले

मुंबई | मुसळधार पावसामुळे बदलापूर आणि वांगणीदरम्यान महालक्ष्मी एक्स्प्रेस काल (२६ जुलै) प्रवासी अडकली. एक्स्प्रेसमधून आतापर्यंत ३०० प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आले आहे. वांगणीमध्ये एनडीआरएफचे बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. यात महिला आणि लहान मुलांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

एनडीआरएफने ३ बोटीच्या मदतीने एक्स्प्रेसमध्ये अकडलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. यासाठी एनडीआरएफने इंडिया रेफिने बोटी पाण्यात उतरवल्या आहेत. इंडिया रेफिने बचावकार्याचा वेग घेतला असून, जिल्हाधिकाऱ्यांनी या भागात हेलिकॉप्टर पाठविण्यात आले आहे. बदलापूर आणि वांगणी परिसरात काल रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे संपूर्ण वांगमी जलमय झाले आहे.

Related posts

अमृता फडणवीसांच्या अमित शाह यांना ‘चाणक्य’ म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा!

News Desk

उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, फडणवीसांचा गंभीर आरोप

News Desk

राज्यपालांच्या प्रश्नावरुन अजित पवार भडकले!

News Desk