HW News Marathi
मुंबई

महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे अभ्यासवाटीकेची दुरावस्था

मुंबई | दक्षिण मुंबई मधील स का पाटील उद्यान गेल्या काही महिन्यांपासून साफ केल्यामुळे अस्वच्छ झाले आहे. उद्यानात गवत वाढल्यामुळे या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या उद्यानाचा एक भाग विद्यार्थ्यांना अभ्यास वाटीका म्हणून देण्यात आला आहे. या अभ्यास वाटिकमध्ये रोज २५०ते ३०० विद्यार्थी अभ्यास करत असतात .

अभ्यास वाटिका मध्ये जागा नाही झाली की काही विध्यार्थ्यांना गावतामध्ये बसावे लागते.पण हेच गवत साफ न केल्याने या गावतामध्ये साप तसेच इतर सरपटणारे प्राणी असतात गेल्या वर्षी असाच एक साप छपरावरून खाली पडला. त्यामुळे गावतामध्ये बसायला विद्यार्थ्यांना भीती वाटते. गवत व कचरा साफ न केल्यामुळे सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात डास देखील झालेले आहेत.

या उद्यानालगत “कुटुंबसखी” हे हॉटेल आहे नाश्ता करण्यासाठी आलेले नागरिक प्लास्टिक याच ठिकाणी फेकतात. त्यामुळे अजून घाण होते अशी खंत विध्यार्थ्यांनी एच.डब्लू. मराठीशी बोलताना व्यक्त केली आहे. विध्यार्थ्यांना अभ्यास करताना जीव मुठीत घेऊन करावा लागतो.

अभ्यास वाटिका विध्यार्थ्यांसाठी रात्रंदिवस सुरू असते .गेले काही दिवस या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. चार पाणपोई आहेत त्यापैकी आता केवळ दोन सुरू आहेत तर दोन बंद आहेत. बसण्यासाठी असलेले बाक तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी बसणार कुठे हा प्रश्न आहे. पुरुष प्रसाधनगृह (वॉशरूम) मध्ये वीज नाही आणि स्त्री प्रसाधनगृह मधले वरचे छप्पर तुटले आहे ,वीज नाही आशा अनेक समस्यांचा विध्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

अभ्यासवाटीके मधील कामगारांना अभ्यासवाटिका कमिटीचे सहसचिव युवराज निकम व जनार्दन येडगे यांनी जाब विचारला असता अभ्यास वाटिका साफ का करत नाही तर त्यांनी सांगितले, बीएमसी उद्यान अधिकारी साठे आम्हाला परवानगी देत नव्हते. परंतु, अजून ही कामगार अभ्यासवाटीकेच्या निवासस्थानी राहतात पण गवत साफ करत नाही काही कामगार बोलतात, अभ्यासवाटिकेचे कन्स्ट्रक्शन काम चालू आहे त्यामुळे घाण होते मग आम्ही कशाला साफ करू .कामगार विध्यार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे देतात.बीएमसी उद्यान अधिकारी साठे यांची अशी मुजोरी किती दिवस चालणार असा सवाल विद्यार्थी उपस्थित करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेल्वेकडून महिलांना कलात्मक भेट

News Desk

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची बेबी पावडर विक्रीवरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने उठविली

Aprna

कंगना विरोधात दाखल करण्याचे आदेश, धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप

News Desk