HW News Marathi
मुंबई

…आता पुढील स्थानक प्रभादेवी

मुंबई | मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांना ब्रिटीश राजवटीत ठेवण्यात आलेली इंग्रजी नावे आहेत. या रेल्वे स्थानकांच्या नामांतरासाठी वारंवार भारतीय मागणी करत होते. जनतेच्या मागण्या लक्षात घेऊन मुंबईतील एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकाचे नामांतर करण्याचा निर्णय सरकार दरबारी घेण्यात आला. या नामांतराला मंजूरी मिळून तब्बल १२ महिन्यांचा अवधी लोटला परंतु अद्याप हे रेल्वे स्थानक नामांतर अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत होते. अखेर एल्फिन्स्टन रोडच्या नामांतराला प्रशासनाला मुहूर्त मिळाला आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नाव ‘प्रभादेवी’ होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.

गतवर्षी एल्फिन्स्टन दुर्घटनेमुळे २९ सप्टेंबर २०१७ रोजी होणा-या एल्फिन्स्टन रोडच्या नामांतराचा विषय पुन्हा मागे पडला. २९ सप्टेंबर २०१७ रोजी या रेल्वे स्थानकाचे नाव प्रभादेवी असे करण्यात येणार होते. अखेर आता १८ जुलैच्या मध्यरात्रीपासून एल्फिन्स्टन रोडचे नाव प्रभादेवी होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. स्थानकातील नावाचे फलक, इंडिकेटर, उद्घोषणा यंत्रणा इत्यादीमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. तसेच प्रभादेवी स्थानकाचा कोड ‘पी बी एच डी’ असेल, असेही पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकबोटेंच्या जामिनाला आव्हान

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ८ दिवस कर्फ्यू वाढवू शकतात, संजय राऊतांचा इशारा

swarit

एटीएसने कांदिवलीतून ८ बांगलादेशीना अटक

News Desk