HW News Marathi
मुंबई

ऑटो रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ नाही, सर्वसामान्यांना दिलासा

मुंबई | रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात लवकरच दोन रुपयांनी वाढ होणार या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई ग्राहक पंचायतीने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ होणार नाही, अशी ग्वाही परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली. या बैठकीला परिवहन सचिव आणि परिवहन आयुक्तसुद्धा उपस्थित होते. परिवहन मंत्र्यांनी खुलासा केल्यानंतर मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबई ग्राहक पंचायतीच्या प्रतिनिधींनी रावतेंची भेट घेतली. त्यावेळी रावतेंनी दरवाढ होणार नाही. मंगळवारी झालेल्या या बैठकीला परिवहन सचिव आणि परिवहन आयुक्त उपस्थित होते. तर मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे आणि वर्षा राऊत यांनी बाजू मांडली. रिक्षा-टॅक्सी भाड्यात लवकरच दोन रुपयांनी वाढ होणार असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर मुंबई ग्राहक पंचायतीने परिवहन मंत्र्यांची भेट मागितली होती.

दुसरीकडे गेल्या तीन वर्षांपासून ऑटो रिक्षा आणि टॅक्सी युनियन दरवाढीची मागणी करत आहेत. सीएनजीच्या दरातील वाढ आणि जीवनावश्यक खर्च यानुसार भाडेवाढीची मागणी करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षात सीएनजीचे दर प्रतिकिलो तीन रुपयांनी वधारले आहेत. याशिवाय वाहनाचा भांडवली खर्च, वार्षिक देखभाल आणि दुरुस्ती खर्च, इन्शुरन्स, कर या बाबींमुळे भाडेवाढ करण्याचा तगादा ऑटो रिक्षा आणि टॅक्सी युनियनने लावला आहे. मात्र तूर्तास तरी परिवहन मंत्र्यांनी सामान्य प्रवाशांच्या बाजूने निर्णय घेत, भाडेवाढ होणार नसल्याचं म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या…बेस्ट प्रशासनाच्या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे

News Desk

५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरील मालमत्ता कर माफ, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

News Desk

राष्ट्राभिमानी समितीच्या वतीने शिवाजी पार्कमध्ये स्वच्छता मोहीम

News Desk