HW News Marathi
मुंबई

#IndependenceDay : मुंबईतील खास इमारतींना तिरंग्याची रोषणाई

मुंबई | स्वातंत्र दिनाच्या पूर्व संध्येपासूनच राजधानी दिल्ली प्रमाणेच मुंबईत देखील भारतीयांचा उत्साह पहायला मिळत आहे. शहरात मुंबई महापालिकेचे मुख्यालय तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या ऐतिहासिक वास्तू तिरंग्याच्या रंगात नाहून निघाल्याचे पहायला मिळत आहे. मुंबईकरांमध्ये देखील स्वातंत्र दिनाचा उत्साह मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. महापालिका मुख्यालयासमोर असलेल्या सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढण्यासाठी तसेच तिरंग्याचे रंग सेल्फीत कैद करण्यासाठी मुंबईकर प्रचंड संख्येने उपस्थित असल्याचे पहायला मिळाले. अनेक तरुण मंडळी याठिकाणी फोटोग्राफीचा आनंद घेताना पहायला मिळाली.

मुंबई शहारातील काही इमारतींचे फोटो खालीलप्रमाणे ः

पूर्वी व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हे एक ऐतिहासिक रेल्वेस्थानक आहे. महाराष्ट्राचे आदर्श आणि लोकप्रिय राजे छत्रपती शिवाजी यांच्या सन्मानार्थ मार्च १९९६ मध्ये व्हिक्टोरिया टर्मिनसपासून ‘छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत’ त्याचे नाव बदलण्यात आले. पुढे २०१७ मध्ये, पुन्हा एकदा ह्या रेल्वेस्थानकाचे नाव बदलून ‘ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असे ठेवण्यात आले. हे रेल्वेस्थानक देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे. हे रेल्वेस्थानक मध्य रेल्वेचे मुख्यालय म्हणून कार्य करते. ‘व्हिक्टोरियन इटालियन गॉथिक रिव्हायवल आर्किटेक्चर’च्या संकल्पनेनुसार फ्रेडरिक विलियम स्टीव्हन्स यांनी हे डिझाईन केले होते. राणी व्हिक्टोरियाच्या सुवर्ण जयंती समारंभासाठी मुंबईच्या बोरीबंदर परिसरात १८८७ साली बांधण्यात आले. जुन्या बोरीबंदर रेल्वे स्थानकाच्या दक्षिणेला नवीन रेल्वे स्थानक बांधण्यात आले. हे भारतातील सर्वात गर्दीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

 

 

बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. या महापालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प हा भारताच्या काही लहान राज्यांपेक्षाही जास्त आहे. शहर आणि काही उपनगरातील नागरी पायाभूत सुविधा व प्रशासनासाठी बीएमसी जबाबदार असते. या मुंबई महापालिकेचे मुख्यालय मुंबईच्या फोर्ट परीसरात आहे. मुंबई महापालिका मुख्यालयाच्या वास्तूला २०१७ साली १२५ वर्षे झाली आहेत. त्यामुळे ही वास्तू एतिहासिक वारसा म्हणून प्रचंड महत्वाची समजली जाते

मुंबई महानगरपालिका मुख्यालय

 

महात्मा ज्योतिबा फुले मंडई म्हणजेच मनीष मार्केट/क्रॉफर्ड मार्केट होय. हे मार्केट दक्षिण मुंबईच्या सर्वात प्रसिद्ध बाजारांपैकी एक आहे. याचे नाव शहराच्या पहिल्या महानगर आयुक्त ‘आर्थर क्रॉफर्ड’ यांच्या नावावरून ठेवण्यात आले. महात्मा फुले स्मारक समितीच्या अध्यक्षा मखूंद्रराव भुजबळ पाटील यांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर महात्मा जोतिराव फुले यांच्या नावावर या मार्गाचे नाव देण्यात आले. या बाजारपेठेतील बहुतेक विक्रेते वस्तू, सौंदर्य प्रसाधने, घरगुती आणि भेट वस्तू यासारख्या आयातित वस्तूंची विक्री करतात मार्च १९९६ पर्यंत ते नवी मुंबई येथे हलविण्यात आले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाखाली हे बाजारांचे नामकरण करण्यात आले. १८८२ मध्ये, भारतातील वीज निर्मितीची ही सर्वात पहिली इमारत होती.

मनीष मार्केट

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

News Desk

महापालिकेविरोधात त्वरित फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा !

News Desk

…आता पुढील स्थानक प्रभादेवी

News Desk