HW News Marathi
मुंबई

मुंबईत पेट्रोल नव्वदी पार

मुंबई | दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होताना पहायला मिळत आहे. वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनता महागाईमुळे त्रस्त आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सोमवारी पुन्हा एकदा वाढ झालेली पहायला मिळत आहे. पेट्रोल ११ पैशांनी तर डिझेल ५ पैशांनी महागले आहे. मुंबईत सध्या पेट्रोलने नव्वदी गाठली आहे. त्यामुळे मुंबईकरांना सध्या प्रति लिटर पेट्रोलसाठी ९०.०८ रुपये मोजावे लागणार आहेत.

मुंबईमध्ये पेट्रोल प्रतिलिटर ९०.०८ रुपये तर डिझेलचे दर प्रतिलिटर ७८.५८ रुपये एवढे झाले आहेत. तर नवी दिल्लीमध्ये पेट्रोल ८२.७२ रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर ७४.०२ रुपये प्रतिलिटर एतके झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एलफिस्टन आणि करी रोड पुल फेब्रुवारी महिन्यात खुला

swarit

तरूणीवर सामूहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न

News Desk

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सर्व्हर डाऊन

Aprna