HW News Marathi
मुंबई

कुत्र्यावर बलात्कार…मुंबईत सुरक्षारक्षकाला अटक

मुंबई- लैंगिक भूक भागवण्यासाठी माणूस कोणत्याही थराला जावू शकतो, याचे एक धक्कादायक उदाहरण मुंबईत उघडकीस आले आहे. एका व्यक्तीने आपली लैगिंक भूक भागवण्यासाठी कुत्र्यावर बलात्कार केल्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईत चेंबूरमध्ये एका गृहनिर्माण सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने हे कृत्ये केले असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

सीसीटीव्ही फुटेजमुळे हे कृत्य उघड झाले. राम नरेश (41) असे आरोपीचे नाव आहे. चेंबूर नाक्याजवळील एका गृहनिर्माण सोसायटीत तो सुरक्षारक्षकाचे काम करायचा. सलग तीन दिवस त्याने कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केले. राम नरेश कुत्र्याला बाथरुममध्ये घेऊन गेल्यानंतर आतमधून दरवाजा बंद करायचा. पाच ते सात मिनिट तो कुत्र्यासोबत बाथरुममध्ये असायचा. या सोसायटीच्या सचिव अस्मिता देशमुख यांनी मागच्या काही दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी राम नरेश कुत्र्याला बाथरुममध्ये घेऊन गेल्यानंतर आतमधून दरवाजा बंद करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. राम नरेश दिवसा ऑटोरिक्षा चालवायचे काम करायचा आणि रात्री सोसायटीत सुरक्षारक्षकाचे काम करायचा. त्याला खासगी सुरक्षाकंपनीमार्फत नियुक्त करण्यात आले होते. आयपीसीच्या कलम 377 अंतर्गत एफआयआर दाखल झाल्यानंतर चेंबूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंत्र्यांना सत्तेची मस्ती चढली,जेष्ठ नागरिकांना लिफ्टमधून काढले बाहेर ,विरोधकांच्या तीव्र प्रतिक्रिया

swarit

कंगना राणावत बहिण रंगोली सोबत वांद्रे पोलिस स्थानकात हजर

News Desk

पर्यावरणपूरक उपक्रमाने प्लास्टिक बंदीचे स्वागत

News Desk