HW News Marathi
मुंबई राजकारण

“जे गेले त्यांच्याबद्दल… “; कीर्तिकारांच्या शिंदे गटाच्या प्रवेशावर पेडणेकरांची प्रतिक्रिया

मुंबई:- “जे गेले त्यांच्याबद्दल फार चर्चा करायची गरज नाही” अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी गजानन कीर्तिकर यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशावर दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल रविंद्र नाट्य सभागृह येथे गजानन कीर्तिकर यांचा पक्षप्रवेश पार पडला. पक्षप्रवेशापूर्वी कीर्तिकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी बैठक देखील झाली होती. खासदार गजानन किर्तिकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या (बाळासाहेबांची शिवसेना) गटात सामील झाल्याने उद्दव ठाकरे यांना हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

तर येत्या काही दिवसांमध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होणार असून या पार्श्वभूमीवर गजानन कीर्तिकर यांचा पक्षप्रवेश हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी देखील गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात जाऊ शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. मात्र आता या चर्चा खऱ्या ठरल्या असून उद्धव ठाकरे गटाने देखील कीर्तिकर यांची नेते पदावरून हकालपट्टी केली आहे. यासंदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, गजानन कीर्तिकरांच्या एकनाथ शिंदेंच्या (बाळासाहेबांची शिवसेना) गटाच्या प्रवेशावर किशोरी पेडणेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पेडणेकर म्हणाल्या, “गेल्या काही दिवसांपासून अश्या बातम्या होत्या. पण त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर हे त्यांना नेहमीच समजावत होते. मात्र त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं. जे गेले त्यांच्याबद्दल फार चर्चा करायची गरज नाही. जे येत आहेत, त्यांच्याबद्दल बोला”, असे त्या म्हणाल्या. पुढे बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, अमोल कीर्तिकर हे अजून इथेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात असून ते आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकेरेंसोबत राहिले आहेत त्याबद्दल तुम्ही का सांगत नाही? असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना केला. तसेच ग्राउंड लेवल वगैरे काही आणलेला नाही. जे गेले आहेत त्यांच्याबद्दल फार चर्चा करत आहेत. जे येत आहेत, जे जुडतायत त्यांच्याबद्दल चर्चा करा, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या. .

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू कश्मीरमध्ये भाजप पीडीपी युती संपुष्टात

News Desk

शिवसेना ‘पीडीपी’च्या मंचावर जाताच सगळे आभाळ कोसळल्यासारखे बोंबलू लागले !

News Desk

धवलसिंह मोहिते-पाटील यांची रणजितसिंह निंबाळकर यांना साथ

News Desk