HW News Marathi
मुंबई

पश्चिम रेल्वेकडे सहा नवी सेगवे वाहने, सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल

मुंबई | मुंबईत रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घेत पश्चिम रेल्वे स्थानकावर आरपीएफकडे सहा नवी सेगवे वाहने आली आहेत. पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक ए. के. गुप्ता यांनी प्रजासत्ताक दिनी चर्चगेट स्थानकावर या सहा सेगवे वाहनांचे उद्घाटन केले आहे. त्यामुळे, बॅटरीवर चालणाऱ्या या सेगवे वाहनांद्वारे रेल्वे स्थानकाची पाहणी करणे आता आणखी सोपे झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीत वेळेत मदत पोहोचविण्यासाठी या सेगवे वाहनांची मोठी मदत होते.

चर्चगेट, मुंबई सेंट्रल, अंधेरी, बोरीवली या लोकांची सर्वाधिक गर्दी असणाऱ्या स्थानकांवर प्रत्येकी १ तर वांद्रे टर्मिनसवर २ अशी एकूण ६ सेगवे वाहने चालविण्यात येत आहेत. आता लवकरच आणखी पाच सेगवे वाहने पश्चिम रेल्वेकडे येणार असल्याची माहिती मिळत आहे. ती पाच सेगवे वाहने वांद्रे, गोरेगाव, मालाड, विरार या स्थानकांवर चालविण्यात येतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मृतदेहाच्या अंगावरील सोनेही चोरले

News Desk

मुलुंडमध्ये सिलिंडर स्फोटामुळे आग

News Desk

पेट्रोल झाले स्वस्त !

News Desk