HW News Marathi
मुंबई

सापाने देखील केला लोकलमधून प्रवास

मुंबई | मुंबईकर रोज लोकल मधून प्रवास करतात. गर्दीचं तर विचारू नका. आणि त्यात मुंबईकरांच्या कामच्यावेळेस कोणकोणत्या अडथळ्यांना मुंबईकरांना सामोरं जावं लागतं. ऐन गर्दीच्या वेळेस आज ८.३३ च्या टिटवाळा-सीएसटी लोकलमध्ये चक्क एका सापानेच मुंबईकरांसोबत प्रवास केला.

आज ठाणे स्टेशनवर चालत्या लोकलमध्ये साप आढळल्याने प्रवासी डब्यात एकच खळबळ उडाली. ठाण्यावरुन सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलच्या डब्यात फॅनमध्ये साप दिसल्याने, काहीवेळ गोंधळाचं वातावरण होतं. या गोंधळामुळे काहीवेळ लोकल थांबवण्यात आली. एक लोकल थांबल्यामुळे मागच्या अनेक लोकल गाड्यांनाही थांबावं लागलं. ही लोकल टिटवाळ्यावरुन ८.३३ वा सीएसएमटीकडे निघाली होती.

ही लोकल टिटवाळ्यावरुन ठाण्यापर्यंत आली तोपर्यंत कोणाचंही लक्ष नव्हतं. मग लोकल ठाणे स्टेशनवर प्लॅटफॉर्म चारवर आली तेव्हा एका प्रवाशाचं फॅनकडे लक्ष गेलं. त्याने अन्य प्रवाशांचं लक्ष वेधलं असता, एकच आरडाओरडा झाला. मग एका प्रवाशाने लाकडी पट्टी आणून सापाला फॅनवरुन खाली पाडलं. मग लोकलमधून खाली ट्रॅकवर ढकललं. साप खाली पडल्यानंतर लोकल पुढे रवाना करण्यात आली. लोकल ट्रेनमध्ये आढळून आलेला साप हा हरणटोळ जातीचा हा साप असून तो निरुपद्रवी आहे.

हरणटोळ जातीचा साप

हरणटोळ हा निमविषारी साप आहे. त्याच्या विषाचा गंभीर परिणाम मनुष्याच्या शरीरावर होत नाही. मात्र उंदीर, संसा, बेडूक अशा प्राण्यांसाठी हरणटोळचे विष जीवघेणे आहेत. हा साप दुर्मिळ सापामध्ये येत नसला तरीही तो क्वचितच आढळतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई उपनगर जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांसाठी मोफत वाहन सुविधा

News Desk

मध्य रेल्वे विस्कळीत

News Desk

डबेवाल्यांमध्ये प्रसिद्धीसाठी चढाओढ

News Desk