HW News Marathi
मुंबई

मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकावर पादचारी पुलाच्या कामासाठी विशेष पॉवर ब्लॉक

मुंबई | मध्य रेल्वे मार्गावरील दिवा स्थानकावर पादचारी पुलाच्या कामासाठी शनिवार (१६ फेब्रुवारी) रात्री १० वाजून ४५ मिनिटांपासून ते रविवारी (१७ फेब्रुवारी) पहाटे ४ वाजून १५ मिनिटांपर्यंत विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉक दरम्यान पुलाचे गर्डन टाकण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक पूर्ण बदल करण्यात आले आहेत.

या विशेष पॉवर ब्लॉकमुळे रविवारी (१७ फेब्रुवारी) रोजी रात्री १२ वाजून २० मिनिटांनी सुटणारी ५०११९ दिवा-पनवेल पॅसेंजर आणि पहाटे ४ वाजून ४५ मिनिटांची ५०१२० पनवेल-दिवा पॅसेंजर या गाड्या रद्द केल्या आहेत. या ब्लॉकमुळे शनिवारी रोजी रात्री ८ वाजून १० मिनिटांनी येणारी ५०१०६ सावंतवाडी-दिवा पॅसेंजर गाडी पनवेल स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार आहे.

तसेच ५०१०५ दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडी रविवारी सकाळी ७.१३ वाजता पनवेल स्थानकातून सोडण्यात येणार आहे. ब्लॉकमध्ये १२१३४ मँगलोर जंक्शन-सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आल्यामुळे ही गाडी ५० मिनिटे उशिराने मुंबईत दाखल होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऑगस्टमध्ये सुट्यांचा हंगाम

News Desk

शून्य कचरा प्रदर्शनातून नागरिकांनी घेतले खत निर्मितीचे प्रशिक्षण

News Desk

आज मध्यरात्रीपासून आंतरराज्यीय विमान सेवा बंद

swarit