HW News Marathi
मुंबई

ठाणे | कांद्याचे व्यापारी अशोक चौधरी यांची 2 करोड 27 लाख रुपयांची फसवणुक

मुंबई | अशोक चौधरी यांचे पांचपाखाडी येथे ‘सोनु कार्गो म्हूवर्स ‘नावाचे ऑफीस आहे , त्यांचे दोन एम्प्लॉइज हरीश कारवा आणि योगेश शहा हे त्यांच्या कडे बऱ्याच वर्षांपासून कामाला होते.

अशोक चौधरी यांनी इंदौर येथे मध्यप्रदेश सरकार कडून तीन हजार टन कांदा विकत घेतला व इंदौर येथे तात्पुरत्या स्वरूपात दोन गोडाउन भाडेतत्वावर घेतले, व तीन हजार टन कांदा त्यांनी तेथील गोडाउन मधे ठेवला, व हरीश कारवा व योगेश शहा यांना देखरेखी साठी आणि मार्केटिंग करण्या साठी तिथे ठेवले. त्या दोघांनी मार्केटिंग करून सगळा कांदा विकुन टाकला.

तीन हजार टन कांदा विकुन त्यांनी 1669 टन चे पैसे अशोक चौधरी यांना दिले व 1331 टन माल विकून त्याचे 2 करोड 27 लाख रुपये दोघांनी हडप केले. त्या दोघांकडे या बद्दल जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर द्यायला सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याची कळाल्यानंतर त्यांनी ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशन मधे दोघांविरोधि तक्रार दाखल केली त्या अनुषंगाने तक्रारी मधे तथ्य असल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक बनकर यांनी हरीश कारवा व योगेश शहा यांच्या विरूद्ध आइपीसी कलम 420,406,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला.

आपल्याला अटक होणार या भीतीने हरीश कारवा याने ठाणे कोर्टात अन्टिसिपिटेड साठी अपलाय केले* , तिथे त्याला मेडिकल ग्राउंड वर 6/4/2018 पर्यंत एन्ट्रिम बेल मिळाली आहे , व योगेश शहा फरार आहे , आज गुन्हा दाखल होऊन पंधरा दिवस झाले तरी योगेश शहा या आरोपीला अटक करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत ,व उद्या हरीश कारवा यांची एन्ट्रिम बेलची मुदत संपत आहे तरी या दोन्ही आरोपींना अटक करून न्याय मिळवून द्यावा अशी अशोक चौधरी यांची वरिष्ट पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बापमाणूस’च्या सेटवर रंगपंचमी

News Desk

स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही भ्रष्टाचार होऊ शकतो हे पहिल्यांदाच कळले !

News Desk

उल्हासनगरातील शौचालयचा दुरावस्थेचा ठपका

News Desk