Site icon HW News Marathi

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची बेबी पावडर विक्रीवरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने उठविली

मुंबई | जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला (Johnson & Johnson Company) बेबी पावडरच्या विक्रीवरील बंदी मुंबई उच्च न्यायालयाने उठविली आहे. यामुळे जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीवर बेबी पावडर (Baby Powder) बनविण्याचा परवाना रद्द करण्याची केलेल्या याचिका आज (11 जानेवारी) न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यानंतर बेबी पावडरच्या जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला उत्पादन करता येणार आहे.

 

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या याचिकेवर न्यायमूर्ती गौतम पटेल आणि एसजी ढगे यांच्या खंडपीठाने बेबी पावडरच्या विक्रीवरील बंदी उठविण्याचा निकाल दिला आहे. मुंगी मारण्यासाठी आपण हातोड्याचा वापर करू शकत नाही, असे विधान न्यायालयाने याचिका फेटाळताना म्हटले आहे. कंपनीचे एक सँपल स्टँडर्ड क्वालिटीचे नाही. यामुळे कंपनीचा परवाना रद्द करणे हे कठोर पाऊल असेल, अशी टिप्पणी न्यायालयाने निकाल देताना केली आहे.

 

Exit mobile version