HW News Marathi
मुंबई

लालबागच्या राजाचे मुखदर्शन सोहळा संपन्न

मुंबई | मुंबईसह देशभरातील लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजाचे (lalbaugcha raja) आज मुखदर्शन पहायला मिळाला. लालबागच्या राजाचे आज (29 ऑगस्ट) सायंकाळी 7 वाजता मुखदर्शन पहायला मिळाले. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली.  यावेळी गणेश भाविकांनी आतुरतेने वाट पाहत होते. गेली दोन वर्ष कोरोनामुळे भाविकांना बाप्पाचे दर्शन करता आले नव्हते. परंतु, यंदाच्या गणेशोत्सवात कोणतेही बंधने नसल्यामुळे धुमधाममध्ये साजरा करणार आहे.

लालबागच्या राजाचे यंदाचे वर्ष हे 89 वे आहे. लालबागच्या राजाच्या मंडपात अयोध्येतील राम मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे. राज्यभरातील मोठोमोठ्या मंडपात गणेश मुर्तीचे आमगन सुरू झाले असून यंदा मंडळातर्फे बुधवारी म्हणजेच, 31 ऑगस्ट 2022 ते रविवार 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत साजरा होणार आहे.

लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा हा जून महिन्यात पडला असून तेव्हापासूनच लालबागमध्ये बाप्पाच्या आगमानाचे वेध लागले होते. लालबागच्या राजाची मूर्ती बाहेरून न आणता येथेच घडवली जाते. लालबागच्या राजाचे पाद्यपूजन सोहळा पार पडल्यानंतर मूर्ती घडवण्याचे काम सुरू होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना आमदार तुकाराम कातेंवर हल्ला

swarit

उशिरा पोहचल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत बसू दिले नाही

News Desk

मुंबईची तुलना पटन्याशी सीएम यांना भोवणार का?

News Desk