Site icon HW News Marathi

बोरीवलीमध्ये चार मजली इमारत कोसळली; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

मुंबई। बोरीवलीमध्ये चार मजली इमारत कोसळल्याची (borivali building collapse) धक्कादायक घटना घडली आहे. बोरीवलीतील साईबाबा नगरमधील गीतांजली इमारत कोसळल्याची घटना आज (१९ ऑगस्ट) दुपारच्या सुमारास कोसळली. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे. काही जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अग्निशमन दलाने दुर्घटनेचा स्तर दोन असल्याचे जाहीर केले. त्यामुळे घटनेचे गांभीर्य वाढले होते. परंतु, इमारत आधीच रिकामी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तरी देखील ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का? याचा शोध सुरू आहे. इमारत कोसळल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात व्हिडिओत इमारत एका क्षणात जमिनदोस्त झाली.
Exit mobile version