Site icon HW News Marathi

कल्याण-डोंबिवली पालिकेचे ट्वीटर अकाऊंट हॅक

मुंबई | कल्याण-डोंबिवली महापालिकेचे (KDMC) अधिकृत ट्वीटर अकाऊंट हॅक झाल्याची घटना घडली आहे. केडीएमसीचे ट्वीटर अकाऊंट हॅक झाल्यानंतर त्यांचे नाव बदलून ते vitalik.eth  करण्यात आले होते. केडीएमसीचे ट्वीटर अकाऊंट हे आज (15 सप्टेंबर) 10 वाजताच्या सुमारास हॅक झाले होते. यानंतर अकाऊंटवरून क्रिप्टोमधील इथेरियम प्रमोशनचे ट्वीट केले होते.

केडीएमसीच्या अकाऊंटवरून इथेरियम प्रमोशनचे ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये एक लिंक ही दिली होती. यात इथेरियम ब्लॉकचे मर्ज होणार आहे. यामुळे इथेरियम ब्लॉकचे मर्ज होणार असल्याचे प्रमोशन केले जात आहे. या ट्वीटच्या लिंकवर क्लिक करु नये, असे आवाहन केडीएमसीने केले आहे. यानंतर पालिकेने लवकरच केडीएमसीचे ट्वीटर अकाऊंट पुन्हा रिक्व्हर करण्याचे काम सुरु आहे.

Exit mobile version