Site icon HW News Marathi

आरे मेट्रो कारशेड प्रकरणाची पुढील सुनावणी 30 ऑगस्टला होणार

मुंबई | मेट्रो – 3 साठी आरे कारशेड (Aarey Metro) याचिकेवर पुढील सुनावणी 30 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. आरे कारशेड विरोधातील याचिकेवर आज (24 ऑगस्ट) सुनावणी पार पडली. न्यायालयाने राज्य सरकार, एमएमआरडीसीला कागदपत्रे जमा करण्यासाठी मुदत मागितली होती. तरी देखील कागदपत्रे न्यायालयात सारद केले नाही. कागदपत्रे सादर करण्यासाठी अजून 30 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे.

आरे कारशेडवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले असून अजून किती दिवस सुनावणी पुढे ढकलणार?, असा सवाल न्यायालयाने सरकारला विचारला आहे. परंतु, पुढील सुनावणीपर्यंत आरेमधील झाने न तोडण्याचे याआधीचे आदेश न्यायालयाने कायम ठेवले आहे. आरे कारशेड प्रकरणी न्यायालयात 7 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या वकिलाने न्यायालयाने आणखी 2 दिवस म्हणजे 29 तारखेपर्यंत कागदपत्रे सुपूर्द करण्यासाठी वेळ मागितला होता. यानंतर न्यायालयाने 30 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवली आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार आले. या सरकारने कांजूर येथील कारशेडच्या जागेला स्थगिती दिली. कांजूर येथील जागा न्याय प्रविष्ट आहे. पुन्हा एकदा आरे येथे मेट्र कारशेड होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर पर्यावरण प्रेमींनी आरे वसाहतीत वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप करत, त्यांनी न्यायालयात धाव घेतली. यानंतर पर्यावरण प्रेमींनी ‘आरे वाचवा’ मोहिम सुरू केली. या मोहिमेतंर्गत आरे मेट्रो कारशेडविरोधात आंदोलन सुरु आहे.

 

 

 

Exit mobile version