Site icon HW News Marathi

मुंबईतील वन अविघ्न पार्क इमारतीला पुन्हा आग; अग्निशमन दलाच्या प्रयत्नांना यश

मुंबई | मुंबईतील लालबाग परिसरातील वन अविघ्न पार्क (One Avighna Park) इमारतीच्या 35 व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळाताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या इमारतीला आज (15 डिसेंबर) 10 वाजताच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली होती. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या आगीत अद्यापही कोणातीही जीवीतहानी झालेली नाही.

या इमारतीला लागलेली आग ही लेव्हल – 1 ची आग लागल्याची माहिती मिळाली आहे. वन अविघ्न पार्क ही इमातर 60 मजली आहे. ही इमारत मध्य रेल्वेजवळी करी रोड स्टेशनच्या बाजूला आहे.  यापूर्वी 2021 मध्ये ऑक्टोबर महिन्यात वन अविघ्न पार्क इमारतीला आग लागली होती. तेव्हा 19 व्या मजल्यावरून पडून एका कामगारांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, ही इमारतीच्या बाजूला अनेक बैठी घरे आणि आचळी आहेत. या इमारतीपर्यंत पोहोचण्याचा रस्ता हा चिंचोळी असल्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना अडचणींचा सामना करावा लागला.

 

Exit mobile version