HW News Marathi
मुंबई

शिवस्मारक पायाभरणीसाठी गेलेल्या एकाचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई | शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या स्पीड बोटचा दुर्दैवी अपघात झाला आहे. या बोटीत २५ जण असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पहिल्यांदा बोटीतील सर्वच जण सुखरूप असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र नंतर १ व्यक्ती बेपत्ता असल्याचे लक्षात आले. ती व्यक्ती बुडाल्याची भीती देखील व्यक्त केली जात होती. मात्र आता या व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. मृत व्यक्तीचे नाव सिद्धेश पवार असे आहे.

येथे गेलेल्या तीनपैकी एका स्पीड बोटीमध्ये अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्ते होते.अपघात झालेल्या स्पीड बोटीमध्ये पाणी गेल्याने ही बोट बुडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे मुख्यसचिव देखील या बोटीतून प्रवास करत होते. या अपघातामुळे शिवस्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.नरीमन पॉंइट पासून २.६ किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला आहे. दरम्यान, ही स्पीडबोट खडकावर आदळल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या बोटीत पाणी शिरल्याने ही बोट बुडाल्याची माहिती मिळत आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मलिष्काच्या नावाने मुंबईत शंख, मलिष्का मात्र अमेरिकेत करतेय मज्जा

News Desk

राज्यातील हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

News Desk

मुंबई पोलिसांसाठी ऑन ड्यूटी ८ तास

swarit