Site icon HW News Marathi

उदय सामंत आणि संभाजी राजेंच्या बोटीला अपघात; सुखरुप बचावले

मुंबई | राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि माजी खासदार छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांच्या स्पीड बोटला अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या आपघातात उदय सामंत आणि छत्रपती संभाजीराजे हे दोघेही सुखरुप बचावले.  सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही स्पीड बोटवरील नियंत्रण सुटले आणि ही स्पीड बोट मांडवा जेट्टीच्या खांबाला घासल्याची माहिती माध्यमातून समोर आली आहे.

दरम्यान, गेट ऑफ इंडियावरुन मांडवा येथे अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयात शिवराज्याभिषेक सोहळा नियोजनाच्या बैठकीसाठी जात होते. मांडवा जेट्टी जवळ आल्यावर स्पीड बोट जेटीवर लावण्यासाठी वळवली. त्यावेळीच स्पीड बोटवरील नियंत्रण सुटल्यानंतर अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहान झाली नाही. या अपघातानंतर उदय सामंत आणि छत्रपती संभाजीराजे रस्तेमार्गाने मांडवा येथे पोहोचले

Exit mobile version