HW News Marathi
मुंबई

मांजर फेकल्याच्या जाब विचारला म्हणून महिलेचा खून

पुणे शेजा-याच्या घरात गेलेल्या मांजरीला बाहेर फेकल्याचा जाब विचारल्याने शेजा-याने केलेल्या बेदम मारहानीत एका महिलेचा मृत्यू झाला आहे . प्रभा रणपिसे (40) असे मृत महिलेचं नाव आहे. ही घटना रविवारी रात्री घडली आहे. याप्राकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करूण अमोल बालगुडे, गणेश ऊर्फ भय्या पाटील, आकाश मोंढे आणि राजीव साळवे यांना हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

रविवारी रात्री नऊच्या सुमारास नंदकुमार साळवे यांच्या घरात रात्रीचे जेवण सुरू होते. यावेळी रणपिसे यांचे मांजर साळवेंच्या घरात घुसले. आणि जेवणाऱ्यांच्या ताटात तोंडही घातले. यामुळे संतप्त झालेल्या साळवे कुटुंबीयांनी रागाच्या भरात मांजराला उचलून घराबाहेर फेकले. ज्यांची ही मांजर होती त्या शेजारी राहणाऱ्या प्रभा यांनी त्यांना याचा जाब विचारला असता दोघात वाद झाला. वादाचे रूंपातंर हाणामारीत झाले. साळवे कुटुंबीयांनी प्रभा रणपिसे, त्यांची दोन मुलं आणि जावई या चौघांना बोलावून लाथाबुक्क्या, बांबू आणि पाइपने बेदम मारहाण केली. या मारहाणीत प्रभा रणपिसे या महिलेच्या डोक्यात जबर मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या, तर त्यांचे जावई आणि दोन मुलंदेखील जखमी झाले. प्रभा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत. अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज, ट्विटर आणि जी प्लसला फॉलो करा

https://www.facebook.com/mahabatmi365/

https://plus.google.com/u/0/

https://twitter.com/Mahabatmi1

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शौचालयाची टाकी कोसळून तीन जणाचा मृत्यू

News Desk

गोवर संसर्ग : मुलांचे लसीकरण करुन घेण्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन

Aprna

४० हजार अन्नदात्याचा आपल्या हक्कासाठीचा खडतर प्रवास थेट सरकारकडे, त्यापैकी ९० टक्के मागण्यांवर निवारण

News Desk