HW News Marathi
मुंबई

गेट वे ऑफ इंडिया येथे मुंबईकरांची योगासने

मुंबई | आज जगभरात चौथा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला जात आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे मुंबईकरांनी चौथा आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा केला. शालेय व क्रीडा विभाग, पतंजली योगा समिती आणि मुंबई ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यामाने गेट वे ऑफ इंडिया येथे मुंबईकरांसाठी योगाचे आयोजन करण्यात आले होते.

बहुसंख्या मुंबईकरांनी म्हणजे अगदी लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येक वयोगटातील व्यक्तींनी या कार्यक्रमात सहभागी होऊन योगासने केली. मुंबईसारख्या धकाधकीच्या जीवनात मुंबईकर आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत. परंतु योगा दिनाच्या निमित्ताने का होईना. परंतु, मुंबईकरांनी आरोग्यासाठी थोडा वेळ काढावा हेच या योगा दिनाच्या माध्यमातून मुंबईकरांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री राज पुरोहित आणि खासदार अरविंद सावंत राजकीय मंडळींनी देखील योगासाने केली. संपूर्ण जगभरात आज आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा होता आहे. प्रत्येक ठिकाणी योग दिन उत्साहत साजरा केला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील अनेक हॉटेलमधे ग्राहकांची फसवणूक !

News Desk

 दिव्याचा दिव्य अभिनय, तीन तास जमिनीखाली

News Desk

अंधेरीमध्ये पेपर बॉक्स इंडस्ट्रीची भिंत कोसळली, १ जण जखमी

News Desk