HW News Marathi
मुंबई

अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना तीन दिवसीय पोलीस कोठडी

कल्याण | कल्याण-डोंबिवली (केडीएमसी) महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना न्यायालयाने तीन दिवसीय पोलीस कोठडी सुनावली आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी १३ जून रोजी ८ लाखांची लाच घेताना संजय घरत यांना रंगे हाथ पकडले होते. या लाचखोरीच्या प्रकरणात अजून चार जणांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

संजय घरत यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करु नये म्हणून त्यांनी संबंधिताकडे ४२ लाख रुपयांची मागणी केली होती. परंतु तडजोड करुन ३५ लाख देण्याचे ठरले होते. त्यापैकी ८ लाखांचा पहिला हफ्ता आपल्या कार्यालयात घेणार असल्याची माहिती ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घरत यांना रंगे हाथ पकडून त्यांना अटक करण्यात आली होती.

संबंधित बातम्या | केडीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांनी घेतली ८ लाखांची लाच

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिक्षणमंत्र्यांवर मानसिक छळाचा गुन्हा नोंदवा – आदित्य ठाकरे

News Desk

ड्रायव्हिंग लायसन्स आता कॉलेजातच मिळणार!

News Desk

सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी – चंद्रकांत पाटील

News Desk