HW News Marathi
मुंबई

आज पुन्हा मध्य रेल्वेचा खोळंबा, खडवली स्थानकाजवळ रुळाला तडे

मुंबई | मध्य रेल्वेची वाहतूक आज (६ जून) पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. खडवली रेल्वे स्थानकाजवळ रुळाला तडे गेल्याने वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे. या परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकावर झालेला दिसून येतो. मध्य रेल्वेची तब्बल ३५ ते ४० मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

रेल्वे प्रशासनाकडून याची तातडीने दखल घेण्यात आली असून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रशासनाकडून लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. याआधी काल (५ जून) देखील मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. डोंबिवली स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. यामुळे जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावर वळविण्यात आली होती. तसेच मध्य रेल्वेच्या गाड्या २० ते २५ मिनिटे उशीराने धावत होत्या. कल्याण, डोंबिवलीहून दररोज हजारो प्रवासी सीएसएमटीच्या दिशेने प्रवास करतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खोणी येथे टेम्पो अपघातात शाळेत जाणा-या एका अल्पवयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू तर दोन जण जखमी

News Desk

लोकलने सिग्नल तोडल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

swarit

कॉंग्रेस आमदारावर मनसे नेत्याचा पैशांचा पाऊस

Gauri Tilekar