HW News Marathi
मुंबई

दाऊदच्या हॉटेलच्या जागी शौचालय

मुंबई दाऊद इब्राहीमच्या भेंडी बाजारस्थित ‘रौनक अफरोझ’च्या जागी सार्वजनिक शौचालय बांधण्याचा मनोदय स्वामी चक्रपाणी यांनी व्यक्त केला आहे. यापूर्वी चक्रपाणी यांनी दाऊदची कार लिलावात विकत घेऊन जाळून टाकली होती.

हॉटेलचा १४ नोव्हेंबर रोजी लिलाव होणार आहे. यासाठी चक्रपाणी शुक्रवारी मुंबईत आले होते. या वेळी ते म्हणाले, ‘अफरोझ हॉटेल विकत घेऊन त्या जागी सार्वजनिक शौचालय बांधण्याची माझी योजना आहे. ही संपत्ती विकत घेऊन मला हे दाखवून द्यायचे आहे की, दहशतवादाचा नायनाट कसा होतो? शौचालयाचे बांधकाम झाल्यानंतर ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत त्याचे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यंदा कितीही थर लावा; न्यायालयाने निर्बंध हटविले

News Desk

पीडितांना मिळणार तात्पुरता निवारा

News Desk

शेअर निर्देशांकांची विक्रमी झेप

News Desk