Site icon HW News Marathi

अमित शहांनी सहकुटुंब घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

मुंबई । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे आज मुंबई दौऱ्यावर आहेत. अमित शहा यांनी लालबागचा राज्याचे (lalbaugcha raja) सहकुटुंब दर्शन घेतले आहे. यावेळी अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. यानंतर अमित शहा हे भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले आहे.

दरम्यान, अमित शहा यांचा ताफा फडणवीसांचे निवासस्थान सागरच्या दिशेने रवाना झाला आहे. सागर येथे महाराष्ट्र भाजपचे काही बडे नेते येथे उपस्थित होते. “गणेशोत्सवादरम्यान मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव आहे”, लालबागचा राज्याचे दर्शन घेण्यापूर्वी अमित शहांनी त्यांच्या अधिकृत ट्विट हँडलवर ट्वीट केले आहे. शहा हे काल (४ सप्टेंबर) मुंबईत दाखल झाले आहे. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले. अमित शहांनी ट्वीट करत म्हटले, “गणेशोत्सवादरम्यान मुंबईत असणं हा एक विशेष अनुभव आहे. आज मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन त्यानंतर वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होईन. शिक्षक दिनानिमित्त दुपारी पवईत नाइक चॅरिटेबल ट्रस्टच्या ए एम नाइक विद्यालयाचे उद्घाटन होईल.”

असा आहे अमित शहांचा मुंबई दौरा

संबंधित बातम्या

Exit mobile version