HW News Marathi
मुंबई

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची आज राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

योगी आदित्यनाथ यांनी राजभवनातील  ब्रिटिश कालीन भुयारात निर्माण करण्यात आलेल्या ‘क्रांतिगाथा’ या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या संग्रहालयाला भेट दिली. यावेळी  त्यांनी संग्रहालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपुढे नतमस्तक होऊन शिवरायांना अभिवादन केले. उपस्थित अधिकाऱ्यांकडून त्यांनी संग्रहालयातील सर्व क्रांतिकारकांची माहिती जाणून घेतली.

आदित्यनाथ यांनी भूमिगत संग्रहालयाबाहेर समुद्रकिनारी असलेल्या श्रीगुंडी देवीचे दर्शन घेतले व उपस्थितांसोबत देवीची आरती केली. यावेळी त्यांनी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या ध्यानमग्न भगवान शिवाच्या मूर्तीचे दर्शन घेतले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत

News Desk

मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील ड्रग्सचा फैलाव थांबवा! – सचिन सावंत

Aprna

राज्यातले सरकार नथुरामाच्या विचाराचे: सचिन सावंत

News Desk