HW News Marathi
मुंबई

वडाळ्यात इमारतीला आग, १५ जण गुदमरले

मुंबई | वडाळा पूर्व येथील एसआरएच्या एका इमारतीत आज (२१ जून) पहाटे आग लागली. या आगीत १५ जण गुदमरल्याची माहिती मिळत आहे. ही घटना १५ जणांना परळ येथील के. ई. म. रुग्णालयात दाखल करण्यात आले होत. आग लागल्याची माहिती मिळाताच अग्निशमन दलाने १ तासातच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

वडाळा पूर्व येथील श्री गणेश साई एसआरए इमारतीत आज सकाळी साडे तीनच्या सुमारास आगी लागली होती. आगीचे कारण मात्र अजूनही स्पष्ट झालेले नाही. आग भडकताच स्थानिकांनी पोलीस आणि अग्निशमन दलाला कळविले. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. पहिल्या मजल्यावर अडकलेल्या १५ जणांचा आगीच्या धुरामुळे श्वास कोंडला होता. त्यांना तात्काळ के.ई. म. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असून या सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पहाटे चारपर्यंत आग पूर्णपणे आटोक्यात आली होती

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महिला पदाधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी धारावी भाजप अध्यक्षावर गुन्हा दाखल

Gauri Tilekar

मानखुर्दमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांनी केली पोलिसांना मारहाण

News Desk

मेट्रो-३ च्या रात्रीच्या कामाला अखेर उच्च न्यायालयाची परवानगी

Gauri Tilekar